गुरुवार, २५ ऑगस्ट, २०१६

..माझ लाडक् बामणी गावं..

हे गाव किती सुंदर ,हे गाव किती सुंदर ,
जेथे आहे एकात्मतेची लहर.
नाते आहे माणुसकीचे, नाते आहे आपुलकीचे,
पण गावाकडे वाईट नजरेने पाहणाऱ्यांना बामणीकर
हनुमान चौकातच कुचे ....

प्रत्येक नवपिढी साजरी करते सार्वजनिक कार्यक्रम,
तेव्हा बघा बामणी कशी चमकते चमचम.....
बामणी तील प्रत्येक पिढीतील तरुण आहे शिकलेला ,
कुणीही दाखवा बामणीकर कुणापुढच नाही झुकलेला.

जोपर्यंत या गावची शान , तोपर्यंत मारूतीलाच मान
बामणी ते पंढरपूर असते गावातून वारी
ती वारी लहानांपासून म्हातारा माणुसही करी, मग तुम्हीच ठरवा या बामणीला विठुरायाचा आशिर्वादच किती असेल भारी....

बामणीत आहे डिजिटल शाळा म्हणून विकासाला नाही आळा,  व ग्रामपंचायतीला नाही टाळा.....
या पावनभुमीत नेतेमंडळी होऊन गेली आदर्श,
ज्यांच्या कर्तृत्वाला करताच स्पर्श, अवघी पंचकृशी करते त्यांचे स्वागत सहर्ष. ..

अशा युवांनओ ,नवपिढी तरूणांना सांगण एकच कि,
प्रत्येकजण करा जोमाने कष्ट
बामणीचेच नाव गाजवा सगळीकडे स्पष्ट. .....
येथिल जुन्या माणसांचे जीवन म्हणजे चौकातील हाॅटेलातला एक चहा 2खारी यांचे प्रेम व दोस्ती लयच भारी...........

रविवार, २१ ऑगस्ट, २०१६

हनुमान मंदिर बामणी

गावात गेल्यावरच गावाच महत्त्व गावानच दिलं
महत्वाचे म्हणजे जीवनदान मला त्या हनुमानानेच दिलं

घरातील एक एक व्यक्ती त्या हनुमानाचा भक्त आहे
खर सांगायच तर आमच्या उसळत्या अंगात त्या ग्रामदैवताचेच रक्त आहे..........
                              ऋषिकेश पवार (बामणी )
                          9657695783

मैदान

मैदान तुझं मैदान म्हणत म्हणत  सणासुदाला पण  यांनीच घेतलंय रं माझ्या शेताच्या प्रश्नाचं  आजवर तरी कुणाच्या बा ला कळलंय रं सरकार काय करतंय ते ...