मंगळवार, २३ जुलै, २०१९

महामानव आणि त्यांचे विचार

गोड आणि समाजाला वळण दाखवणारा अनुभव
आज काही कागदोपत्री कामानिमित्त समाजकल्याण वसतिगृहात जाण्याचा योग आला तिथे एका मित्राच्या खोलीत गेलो असता मला एक भावनीक दृश्य पाहायला भेटले. तिथे सर्व जातीच्या महामानवांचे photos लावले होते,माझी छाती थोडी अभिमानाने भरून अली तेंव्हा तेथील एक मित्र मला बोलला "जगात काय चालते त्याच्याशी काही मतलब नही, पण ह्या महामानवांमुळे आपण तुम्ही आम्ही हक्काची भाकरी खातोय ,त्यामुळे त्यांचे विचार आत्मसात करून चालणे हाच जीवनाचा उद्देश!"
#सर्वधर्मसमभाव
#महामानव
#मित्रत्व

शुक्रवार, १२ जुलै, २०१९

मराठवाडा पोर

बापाच्या चिंतेत खचलेला
पावसाच्या वाटेवर रुजलेला
धरणीमायेच्या भेगांमध्ये बुजलेला
घामाच्या लाटेवर तरलेला
मीच हाय शेतकरी पोरं...

बापाच्या ओझ्याला मुकलेला
संकटाला हसून हरवलेला
कर्जाच ओझे मनावर झेललेला
मीच हाय शेतकरी पोरं...

मुक्या जनावरांत रमलेला
कधीतरी त्याच्या भुकेला विझलेला
वैरणीला हात थरथरलेला
मीच हाय शेतकरी पोरं...

आभाळाला पाहून जागलेला
खुल्या आसमंताला खंबीरपणे भिडलेला
डोळ्यात आग ओतलेला
मीच हाय शेतकरी पोरं...

अजूनही निरंतर प्रतीक्षेत
          मराठवाडा पोर
ऋषिकेश नानासाहेब लांडे पवार बामणी धाराशिव

मैदान

मैदान तुझं मैदान म्हणत म्हणत  सणासुदाला पण  यांनीच घेतलंय रं माझ्या शेताच्या प्रश्नाचं  आजवर तरी कुणाच्या बा ला कळलंय रं सरकार काय करतंय ते ...