मंगळवार, २७ ऑगस्ट, २०१९

बाप माय आणि पोरं

बाप आणि आईच आपल्या
लेकराला सांगणं हाय
भविष्याचा गाडा तुला
स्वतःला वडायचा हाय

कोणाच्या मागे फिरून
का म्हणतो?दादा,भाय
तुला लहानाच मोठं केलं
त्या म्हाताऱ्याला नग इसरतो का काय

भविष्याची चिंता तुला
लागते का नाय
अश्या तुझ्या वागण्यांन
आम्हाला लावशील पकडायला कोनचतारी पाय

तुझ्या नाराजीला पाहून
हातभार मोठा मोबाइल घेऊन दिलाय
त्याला सोबत घेऊन एकदातरी
राणाकडं चक्कर मारून पहायं

माझ्या घामानं फुलवलेला मळा
दुष्काळात होरपुन जाय
शिकून मोठा झाला तर
तूच बनशील आमच्या आधाराची सावली रं माझी माय

म्हणून म्हणतोया अश्वारूढी रथ तुलाच वडायचा हाय

ऋषिकेश नानासाहेब लांडे पवार
बामणी धाराशिव 413506
marathikavitaanicharolya.blogspot.com

शनिवार, १० ऑगस्ट, २०१९

मराठवाड्याची व्यथा by राहूल गरड बामणी

#मराठवाडा...
#उस्मानाबाद_तुळजापूर_लातूर_बीड या #मराठवाड्या च्या 4 भागात एकही #नदीचा_उगम तर नाहीच , पण सध्या च्या घडीला #पाऊस ही नाही...
तस बघाला गेलं तर #महाराष्ट्रात सगळ्यात ज्यास्त #शेतकरी #आत्महत्या याच भागात होतात ,त्याच एकमेव कारण #जोडनदीचा एकही प्रकल्प इथल्या #राजकर्त्यांनी अमलात आणला नाही...
अजूनही आमच्या भागात #पाऊस नाही #शेतकरी अजून पण पावसाच्या आशेवर बसल्यात...
आमच्या भागात #जनावरांना_चारा_पाणी चा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे...
सत्ताधारी वर्ग :- #खासदार_आमदार_पालकमंत्री_जिल्हाधिकारी
यांनी फक्त यांच्याच #तिजोऱ्या भरल्या , बाकीच्यांचा विचारच केला नाही,
का या #सत्ताधार्यांना वाटलं नाही आत्ता पर्यंत की एखाद्या #जोडनदीचा_प्रकल्प या भागात आणावा म्हणून , निवडणूक च्या वेळेस प्रत्येक #गाव_गावात येऊन हे लोक नुसती #अस्वासने देतात ,एकदा का निवडणूक झाली की मग कुठली #अस्वासने_वचने  पुन्हा मात्र 5 वर्षे त्या #गावाकडे_ढुंकून ही बघत नाहीत हे लोक ही खरी परिस्थिती आहे ...
यांनि फक्त यांच्या #तिजोऱ्या भरल्या ,#इस्टेटी वाढवल्या, आज पर्यंत का यांच्या मनात विचार आला नाही की #जोडनदी,किंवा #रोजगारनिर्माण करण्या साठी #MIDC #कंपन्या आपल्या भागात आणाव्या...
आज किती तरी नवतरुण आपलं शिक्षण न पूर्ण करता रोजगार साठी शहराकडे धाव घेतोय ,शहरात मिळेल ते काम करतोय अवघ्या 10 ते 12000 पगारावर काम करून आपल्या कुटुंब संभाळतोय....
का यांनी आजपर्यंत या भागात रोजगार निर्मिती केली नाही ,
नुसता जरी जोड नदीचा प्रकल्प यांनी सुरू केला आमच्या भागात तर तरुण वर्ग दुसऱ्याच्या हाताखाली नोकरी ना करता आपल्या शेतीवर च आपलं अस्तित्व निर्माण करेल...
बोलण्या सारख खूप काही आहे पण आत्तापुरत एवढंच

#एक_शेतकऱ्याचा_मुलगा :-#राहुल_बलभीम_गरड
Mo No (8454961403)
#_जिल्हा_उस्मानाबाद

पवार साहेब आणि त्यांचे महत्व

संवेदन शून्य आणि लबाड भाजप सरकारचा मरणकाळ जवळ आलाय !

संकटमोचक शरद पवार साहेब ...

  ज्या ज्या वेळी महाराष्ट्रावर नैसर्गिक आपत्तीचे संकट कोसळले त्यावेळी आदरणीय पवार साहेब मदतीसाठी  तातडीने धावून जायचे .लातूर किल्लारी चा महाभयंकर भूकंपाचे  संकट शरद पवार साहेबांनी लीलया पेलले. तेथील उधवस्थ कुटुंबांना घरे बांधून दिली , त्यांचे जलत गतीने पुनर्वसन केले. त्यांच्या या कामगिरीमुळे गुजरात चा भूकंप  ग्रस्थानां मदत करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आपत्कालीन मदत समिती गठीत करून गुजरात  मधील आप्तग्रस्थाना वेळेत आणि  भरपूर मदत केली. संकट मोचक शरद पवार साहेबांचे अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या कामगिरीचे तोंड भरून कौतुक केले.राज्यातील व देशातील कोट्यवधी  शेतकऱ्यांना  72 हजार कोटी रुपयांची सरसकट कर्जमाफी केंद्रात कृषी मंत्री असतांना पवार साहेबांनीच मिळवून दिली.फळबाग योजना, कमी दराने पीककर्ज, नुकसान ग्रस्थ शेतकऱ्यांना मोठी आर्थिक मदत, पीक विमा योजना तुन मोठी मदत , दुष्काळ ग्रस्थानां तातडीने मदत  शरद पवार यांनीच केली.साखर उद्योगाला आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत त्यांनीच केली .एकेकाळी भारताला  अन्न धान्य आयात करावे लागत होते ,केंद्रात कृषी मंत्री झाल्यावर अन्न धान्यात क्रांती घडविली आणि भारत  हा अन्न धान्याचा प्रमुख उत्पादक देश बनला . अन्नधान्याचा निर्यातदार  देश घडविण्याची किमया आदरणीय शरद पवार साहेब यांनीच त्यावेळी केली. जनतेविषयी सतत आपुलकी असणारा, त्यांचे दूरदर्शी नेतृत्व संपूर्ण देश जाणतो. त्यामुळेच शरद पवार साहेबांची नेतृत्वाची महाराष्ट्राला गरज वाटते !

       आताचे भाजप चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या सोबत सत्तेची मलई खाणारे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि या दोन्ही पक्षाचे मंत्री यांचे विषयी काय बोलावे ?  या मंडळींना  जनते विषयी ना प्रेम,ना सहानुभूती !
संवेदन शून्य आणि लबाड सरकार व त्यांच्या मंत्र्यांनि   सांगली कोल्हापूर च्या पुरात  संवेदनशीलता गहाण टाकली  हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले.  सांगली कोल्हापूर च्या पुरात माणसे ,जनावरे दगावली, शेती वाहून गेली, घरे पडली  त्यांचा संसार उधवस्थ झाला .तरी फडणवीस यांचे सरकार गंभीर नाही .पुरग्रस्थाना भेटण्यास मुख्यमंत्री  चार दिवस उशिराने पोहचले त्यामुळे मदत  वेळेत  मिळाली नाही .

   दाताड काढत सेल्फी काढणाऱ्या मंत्र्यांचा  निषेध केलाच पाहिजे....

मुख्यमंत्र्यासोबत  पुराची पाहणी करायला गेल्यावर
भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी पूरग्रस्तांना दिलासा देण्याऐवजी बोटीतून पर्यटन करीत राहिले. दात काढत स्वतःचे सेल्फी  फोटो काढत  राहिले यावरून भाजप शिवसेना सरकार व त्यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ कसे बेफिकीर आणि संवेदनशून्य  आहे याचे चित्र आपण टीव्ही वरून पाहिले  आणि वर्तमान पात्रातूनही वाचले आहे. संवेदन शून्य आणि गांभीर्य नसणाऱ्या  भाजपा ला सत्तेतून हाकलले  पाहिजे अशी राज्यातील तमाम जनतेची मनोमन इच्छा आहे .दोन महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत  राज्यातील जनता, शेतकरी,कामगार , नोकरदार  भाजपा    शिवसेनेला मोठा  झटका  देतील आणि दिलाच पाहिजे. शेतकरी विरोधी असणाऱ्या लबाड आणि भष्ट सरकार ला सत्तेतून उलथवून टाकण्यासाठी राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी, शेत मजुरांनी, कामगारांनी एकत्रित झाले पाहिजे आणि तेच तुमच्या आमच्या आणि  महाराष्ट्राच्या हिताचे राहील.

#राष्ट्रवादी_काॅग्रेस_पार्टी_महाराष्ट्र #

मैदान

मैदान तुझं मैदान म्हणत म्हणत  सणासुदाला पण  यांनीच घेतलंय रं माझ्या शेताच्या प्रश्नाचं  आजवर तरी कुणाच्या बा ला कळलंय रं सरकार काय करतंय ते ...