बाप आणि आईच आपल्या
लेकराला सांगणं हाय
भविष्याचा गाडा तुला
स्वतःला वडायचा हाय
कोणाच्या मागे फिरून
का म्हणतो?दादा,भाय
तुला लहानाच मोठं केलं
त्या म्हाताऱ्याला नग इसरतो का काय
भविष्याची चिंता तुला
लागते का नाय
अश्या तुझ्या वागण्यांन
आम्हाला लावशील पकडायला कोनचतारी पाय
तुझ्या नाराजीला पाहून
हातभार मोठा मोबाइल घेऊन दिलाय
त्याला सोबत घेऊन एकदातरी
राणाकडं चक्कर मारून पहायं
माझ्या घामानं फुलवलेला मळा
दुष्काळात होरपुन जाय
शिकून मोठा झाला तर
तूच बनशील आमच्या आधाराची सावली रं माझी माय
म्हणून म्हणतोया अश्वारूढी रथ तुलाच वडायचा हाय
ऋषिकेश नानासाहेब लांडे पवार
बामणी धाराशिव 413506
marathikavitaanicharolya.blogspot.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा