गुरुवार, ५ डिसेंबर, २०१९

ताई न्याय मिळाला

निष्पाप लेकीवर करुनि
हिंसक राक्षसी अत्याचार
देव मोजतोय वरून
त्यांच्या अन्यायाचे भार

त्यास वाटली नसेल
थोडीतरी लाज
चिमणीसारख्या जीवाला
जाळण्यापर्यंत कसला माज?

धगधगत्या त्या आगीमध्ये
तिझ्या स्वप्नांची राख झाली
काय चुकले त्या कर्तव्यदक्ष पोलिसांचे
न्यायासाठी केली त्याने बंदूक खाली

ताई तुझ्या वेदनांनी
तळपला ह्यो देश सारा
त्या नराधमांचा घेतलाय जीव
तरीपण मनात आत्मक्लेशाचाच वारा

त्या षंड़ाना समाजात जगण्याचा
नाही किंचितही अधिकार
मग घटनेच्या विरोधात बसून
जरी केले असतील वार
वर्दीतल्या भावांचे मनस्वी आभार !!!🙏💐

ऋषिकेश नानासाहेब लांडे पवार
marathikavitaanicharolya.blogspot.com

मैदान

मैदान तुझं मैदान म्हणत म्हणत  सणासुदाला पण  यांनीच घेतलंय रं माझ्या शेताच्या प्रश्नाचं  आजवर तरी कुणाच्या बा ला कळलंय रं सरकार काय करतंय ते ...