गुरुवार, ६ ऑक्टोबर, २०२२

मैदान

मैदान
तुझं मैदान म्हणत म्हणत 
सणासुदाला पण  यांनीच घेतलंय रं
माझ्या शेताच्या प्रश्नाचं 
आजवर तरी कुणाच्या बा ला कळलंय रं

सरकार काय करतंय ते 
उघड्या डोळ्यांनी सगळेच बगताय 
माझा गट तर एकच आहे 
जिथे निष्ठा आईबापा पुढं कधी गेलीच नाय

तुमची शक्ती दाखवण्याच्यासाठी 
त्या पोलिसांचे का हाल करता 
तुम्ही ओढाल ओ ताशेरे एकमेकांवर 
मग एवढ्या कोट्यवधींची उधळपट्टी कोणाच्या जीवावर भरता

असो सामान्यांना येड्यात काढायला 
तुमच्यापेक्षा जमतंय व्हय कोणाला 
जनता काय येडी आहे 
तुमचं चालू द्या यावच लागतंय म्हण ठाण्याला
मी हे गर्दीत बोललो तर 
वरून एकजण ओरडत होता 
"जीव जाउस्तर मतदान फक्त बानाला." 

आपण फक्त trp वाढवू  ,
जाणारा जातोयच की राणाला,
मतदान तर सगळेच करतोय की मानाला
एकेदिवशी सगळे सोबतच लागू की दानाला .🤗

ऋषिकेश नानासाहेब पवार (लांडे) बामणी 
धाराशिव

शेतकरी

शेतकरी

काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल पण
झाले असेल सगळ्यांचे पाहुनी 
सनसामान्यांच्या जिवनातले दररोजचे अडथळे कधी जातील वाहुनी.

तुमच्या-आमच्या जनसामान्यांच्या
प्रश्नांचं कोणाला पडलयं खरं
 एका नेत्याच्या पोराचं 
आणि गलिच्छ राजकारणाच्या ढोराचं
 आपल्यासनी मनापासून कौतुक हाय बरं..

गोगलगाय पण येचुन झाली सोयाबीन माझी नासुन गेली. मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाची बातमी लाचारांनी अजून पण बंद नाय केली......

तुझ्या गेलसालच्या पिकाचा हमीभाव सरकारचा घोळ मिटुस्तवर येत नाय वरं 
मग लाखाचं  बी बियाणं मातीत इस्कटायला तुझचं धाडीस कस काय झाल रं..

तु सावकाराच्या नजरेला नजर मिळवुनी
नडलास काय नि मेलास काय
एका रातीत मालक बदलनारी माणसं आपल्यासाठी झगडतील असा माझा बि भरम हाय..

जग थांबल, सरकार बदलल
पण ह्यो शेतकरी नावाचा माथ्याला लावलेला टिळा
 तुलाच मिरवाचाय 
तुलाच मिरवाचाय

त्यामुळ माझी माय
येतील आपल बी सोन्याचं दिस बगायं
तु फकस्त धीरानं रहायं
तु फकस्त धीरानं रहायं



ऋषिकेश नानानासाहेब पवार 
मु पो बामणी
ता. जि. धाराशिव 9657695783

सोयाबीन

पावसानं केलाय नुस्ता राडा आणि सोयाबीन ला लावलाय घोडा, 
पेरणी झाली सोयाबीन आलं डूबाला, पण पावसामुळं तावच आला गवताला
सोयाबीन वर आली गोगल गाय, औषध टाकून सुद्धा गेली नाय, 
 
दररोजच पाऊस सुर्य काय बघनां,
                   आणि 
गवताच्या वर काय सोयाबीन दिसनां, कश्या तरी शेंगा झाल्या निब्बर, 
पण अजून भाव वाढल्याची आली नाही खबर, सोयाबीन आलं काढाला, रोजांन माणसं काय मिळंना
काय करावं तेच कळंना, 
तंड्यावरचा आणला गुत्तेदार,
त्यानं काढलं आपलं हत्यार
आणि म्हणलां द्या 
1 कोंबडं आणि 5 हजार, 
पुन्हा यांच्या साठी विकावं लागलं गोठ्यातलं वाघार, कसं तरी सोयाबीन काडून घेतलं, आणि इकडं चांगलचं रान पेटलं, भरडून न्हेलं सोयाबीन अडतीला, आणि भावचं आला गळतीला,अडतीवाला म्हणतोय यात किती माती आणि खडा, शेतकरी म्हणतोय जरा हिशोबानं लावा थोडा,

 सावकार पाठवतोय अर्ज 
आणि कस फेडावं त्याच कर्ज



जिवलग मित्र विनोद बलभीम माळी यांनी रचलेली कविता

सोमवार, १३ जून, २०२२

आरंभ नव्या संघर्षाचा

आरंभ नव्या संघर्षाचा 
प्रवासाला आपसूक भेदनारा 
मी निघालो जसा वाटसरू 
त्या जखमांना विश्वासाने भरणारा 

कोणास समजावुनि पाहिले
जीव त्यापरी हळवा होता
मातृ पित्रत्वाचे घेऊन धडे 
बालपणास मी मिरवितो आता

फुटलेल्या त्या चष्म्यामधुनी 
दिसेल तेवढे हेरून घेतो
कोणास समजूत घालण्यापरी शांततेत 
अथांग समुद्राकाठी माझा मी गाव वसवितो...

परी जे विश्वासावर डोळे लावून दिपतात 
माझ्या आशेवरती पुष्कळ 
कष्टाच्या त्या घामामधुनी नक्कीच देईल
मी त्यांच्या विश्वासाला निस्वार्थपणे बळ....

आपलाच माऊली🙏❤️
ऋषिकेश नानासाहेब लांडे पवार

शनिवार, ११ जून, २०२२

पुन्हा जगावे त्या ठिकाणी

मी पणाला उरून
आठवणींमध्ये झुरून
स्वाभिमानाला सावरून 
पुन्हा जगावे त्या ठिकाणी....

ठेच मज लागी जिवा
अंतरीचा रोजचाच गारवा
जुन्या क्षणांना आठवूनि 
पुन्हा जगावे त्या ठिकाणी.....

हिंदोळ्याच्या ओसाड रानात
मखमली चाहूल येते मनात 
परी नको आता कोणी म्हणुनी 
पुन्हा जगावे त्या ठिकाणी.....

नाममात्र उरला असेल 
हे पण नाही वळुनी पाहिले
अपेक्षाभंग केला ज्यांनी ,म्हणुनी 
पुन्हा जगावे त्या ठिकाणी....

मीही तेवढाच उंच उडेल 
माझ्या जबाबदाऱ्या एकहाती सावडेल 
स्वप्नपूर्तीच्या त्या दिशेने मी एकटाच उडेल ,म्हणुनी 
पुन्हा जगावे त्या ठिकाणी.....

ऋषिकेश पवार

टीप खास जिवलग मित्र दीपक परीट यांच्या आग्रहास्तव बनवलेली कविता🥰❤️

सोमवार, ६ जून, २०२२

रात्र विचारात दिपणारा एकटाच मी

तुझं अलगद समोरून निघून जाणे पण 
एका अनमोल भेटी पेक्षा कमी नाही
मी हसत हसत जगेल जेवढ आयुष्य राहिलंय उरी
पण समोर येऊन तुझे अनमोल क्षण चोरणार नाही

असच चेहऱ्यावर हास्य कायम ठेव 
तुला मी कधीच दिसणार नाही
तुझ्या आठवणींना दुजोरा देऊन 
जगणेच मला जमणार नाही 

आयुष्याच्या वळणावर हक्काने
गरजेला आवाज देऊन बग 
मी तुझा होतो त्यापेक्षा कित्येक पटीने 
साथीला मागे पुढे पाहणार नाही

असतील नसतील गैरसमज सारे 
परी मी काळजी जरा जास्तच केली 
माझ्या आयुष्यातून राणीच झाली वजा 
दुःख सोसणारा एकटाच मी,
परि रात्र विचारात दिपणारा एकटाच मी ....
rushi125💞forever

अस्वस्थ मन

जवळून पाहतोय मी जे
 सहज कारण सांगून बाजूला झाले
मी मला झालेला त्रास त्यांना सांगु तर नाही शकत 
पण असो ते आनंदी आहेत,मग कश्याला टाकू विरझन

खरच लावला होता का त्यांनी जीव 
हा प्रश्न मला नाही विचारायचा कोणाला 
कारण तर ठरलेलं होत अगोदरच
मग माझीच चूक सांगून केले बाजूला 

नाही येणार समोर 
कधीतरी आजूबाजूला पण भास व्हावा 
मी मनात नसताना पण पाहतोय
तिझ्या आठवणींचा थवा 

सोबत असणारे तर समजून घेतील वाटले 
माझ्या पाठीमागे ज्यानि ज्यांनी माझ्या दुर्भाग्याला  हातभार लावले 
मी नाही आणणार कोठे विघ्न 
मला माझा मार्ग मोकळा आहे ,मीही नाही बांधील कोणाला
परी माझ्या सुखी आयुष्याला शुभचिंतकाणीच चुकीच्या ओळीत रोविले .

माझं जगणे जरी अवघड केले 
तरी मी तुमच्यावर राग धरणारच नाही 
तुम्ही तुमच काम केलं असेल 
धन्यवाद मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही
rushi125💞🙏😊

सोमवार, ३० मे, २०२२

माझ्या आशादायी मुला

जन्म देणाऱ्या आईबापा पेक्षा 
तर कोणी नाही ना मोठे
सगळं दुःख गळ्याला आले की 
एवढीच समजूत मनाला वाटते

परी आई एवढं पांघरून चुकांना 
तीन पण नाही घालू शकली
तुझ्या अंगावरच्या जबाबदाऱ्या बघून तरी 
का अजून थोडा वेळ नाही थांबली ?

बापाने तर टाचा झिजवून 
काढल्या  किरे तुझ्यासाठी
परी तुझ्या हट्टाच्या प्रेमापुढे 
हंबरडा फोडून रडला त्यो तुझ्यासाठी

आता तरी ये जागेवरती
तळहातात जपलेल्या फुला
भविष्याला संघर्ष करून 
मला प्रकाश दे 
     माझ्या आशादायी मुला .....
      माझ्या आशादायी मुला......
 ऋषिकेश नानासाहेब लांडे पवार
9657695783

रविवार, १७ एप्रिल, २०२२

वेडा जीव

जे पाहीजे ते नको आहे फक्त डोळ्यांदेखत राहावं ,
अपेक्षा काहीच नाहीत फक्त कोणीतरी शहानं  म्हणावं. 🤞🏻
दुनियेन तर वेड म्हणून सिद्ध केलंय या जीवाला ,
परी एका जिव्हाळ्याच्या माणसाने हुंदकी न देता स्वतःला सावर म्हणावं.

शुक्रवार, २५ मार्च, २०२२

जीव झुरणीला लागला

तो गेला त्याच आयुष्य सोडून 
कारण समोरची व्यक्तीच त्याच्यासाठी तेवढी खास 
त्याने आजवर कधी हक्क नाही गाजवला
कारण संस्कारिकतेन भरलेल्या लेकराला न दुखवण्याचा अट्टाहास 

त्याला जरी झाला पराकोटीचा त्रास 
गरज नसताना काळजी करणारा तो हमखास
ज्याने भावनेच्या नात्यात अतोनात जपलेला तो श्वास 
परी कुठेतरी मनाला वाईट वाटतय 

आपण चुकलो, चिडलो त्यामागचा स्वतः होणारा त्रास पण वेगळाच असतो नाही
आपण बोलून गेलो एक आणि समोर ऐकू गेले एक,  तेंव्हा जीभ तर कापू का ? 
हा तुच्छ विचार मनी येत नाही का रे ? 

माझं दररोज हसून खेळून वागणे पण बंद झालंय
अस म्हणतात माझ्या सभोवतालची 
मला आपसूक होणारा त्रास सहन करण्यापेक्षा
मला घेऊन तर गेलेला बरा 

आपण यात पडल्यावर ज्या वाऱ्यात असतो 
ते वारे आता ऋतूंना पण ओळखत नाही,
माझ्या अश्या निर्जीव शरीराला 
अवकाळी ने पण फरक पडणार नाही

थोडं तरी समजून घ्याव का रे मला तू
मी पण कोणाच्या तरी अश्रूंसाठी स्वतः झुरलो आहे 
माझ्यासाठी अपुसक अश्रू येणारा मला दिसलाच नाही 
बग

माझ्या या वागण्याचा वेडेपणा नसेल समजत कोणाला 
पण प्रेमाने पोट भरत नाही मग वेड लावलेच का या जीवाला 
जीव लागला माझा झुरणीला ,जीव लागला आहे माझा झुरणीला 
Rushi125😥


मैदान

मैदान तुझं मैदान म्हणत म्हणत  सणासुदाला पण  यांनीच घेतलंय रं माझ्या शेताच्या प्रश्नाचं  आजवर तरी कुणाच्या बा ला कळलंय रं सरकार काय करतंय ते ...