शनिवार, ६ मार्च, २०२१

दुविधेच जाळ...

वाचताना काही पाने विसरून
गेली असतील जीवनाची
परी नजरेखालून गेलेलं तरी
अचूक लक्षात आहे माझ्या,

चुकलो असेल मी किंवा
व्यथा असतील अंतरी दडपून बसलेल्या
परी त्यांना बाहेर न आणता
लढण्याच बळ श्वासात माझ्या

कधी टोकापर्यंत गेलो होतो
आयुष्य माझं संपवायला
मित्र समजून घेणारा होता
माझ्या आवाजाच्या दबक्या स्वरांना

माझ्या झालेल्या चूका
नाहीत भरता येत मला लगेच
आयुष्यात अनेकांना तोंड देत आलोय
वाटतय हा पण हसत हसत सोडवावा पेच

परी एवढ्या उंच दरीत पडताना
मला भान नव्हते काहीच राहिलेले
माझ्या चुकांना आज शब्द फुटत आहेत,परी त्या मज हिनवी जग आणखीन जे स्वप्नांत पाहिलेले

मी अश्या दुविधेला अडवायला
सांगू कोणास सावरायला
नाती गोती तर मला आता करू वाटत नाहीत दूर
मज नकोय आधाराला कोणाचा सहानुभूतीचा पूर

उठून जगायला पहिल्यासारख
बळ येईल का धावून
मज मार्ग नाही दिसत पण नक्कीच
भविष्य प्रकाशात न्यायचंय न्हाऊन.....

मनाच्या धुंदीत
ऋषिकेश नानासाहेब लांडे पवार
बामणी धाराशिव
9657695783

मंगळवार, २ मार्च, २०२१

दारूची कहाणी काल्पनिक

कधी साजेशी कधी सोबती
कधी दुःख तर कधी आनंद साजरा करणारी
तूच ती कधी माझ्या ह्रदयाला छेद करणारी
कधी माझ्या भावनांना क्षणात उमलणारी

मैत्रीत असतेस तू माझ्या
बाकी दुःख विसरायला
प्रेमात साथ देतेस तू मला
खोट्या साथीदाराला ओळखायला

माझ्या परिणामी परिस्थिती सावरायला
माझ्या प्रतिकूल साथीदारास ओळखायला
मी कुठे तिला वाईट बोललो
ती माझ्या जीवापासून कधी दूर गेलीच नाय

कधीतरी आक्षेप घेत असेल दुनिया सारी
मी कधी तुला आक्षेपाने पाहिलेच नाही
तू मज दिली साथ अनमोल आहे
तू माझ्या निर्दयी जीवनाच सार आहे

तुच आहेस लाडकी
मित्र म्हणे कोरडीच वडकी
म्हणजे हे गोळा करायला मोकळे होतील
माझ्या 13 व्या ची मडकी😥🙏

लेखन ऋषिकेश पवार
संदर्भ जागा प्रीतिक निचित च्या डाळिंब बागेत शेजारी जिवलग मित्र अनिकेत गवस च्या अट्टहासात बनवलेली काव्यरचना

मैदान

मैदान तुझं मैदान म्हणत म्हणत  सणासुदाला पण  यांनीच घेतलंय रं माझ्या शेताच्या प्रश्नाचं  आजवर तरी कुणाच्या बा ला कळलंय रं सरकार काय करतंय ते ...