शनिवार, ६ मार्च, २०२१

दुविधेच जाळ...

वाचताना काही पाने विसरून
गेली असतील जीवनाची
परी नजरेखालून गेलेलं तरी
अचूक लक्षात आहे माझ्या,

चुकलो असेल मी किंवा
व्यथा असतील अंतरी दडपून बसलेल्या
परी त्यांना बाहेर न आणता
लढण्याच बळ श्वासात माझ्या

कधी टोकापर्यंत गेलो होतो
आयुष्य माझं संपवायला
मित्र समजून घेणारा होता
माझ्या आवाजाच्या दबक्या स्वरांना

माझ्या झालेल्या चूका
नाहीत भरता येत मला लगेच
आयुष्यात अनेकांना तोंड देत आलोय
वाटतय हा पण हसत हसत सोडवावा पेच

परी एवढ्या उंच दरीत पडताना
मला भान नव्हते काहीच राहिलेले
माझ्या चुकांना आज शब्द फुटत आहेत,परी त्या मज हिनवी जग आणखीन जे स्वप्नांत पाहिलेले

मी अश्या दुविधेला अडवायला
सांगू कोणास सावरायला
नाती गोती तर मला आता करू वाटत नाहीत दूर
मज नकोय आधाराला कोणाचा सहानुभूतीचा पूर

उठून जगायला पहिल्यासारख
बळ येईल का धावून
मज मार्ग नाही दिसत पण नक्कीच
भविष्य प्रकाशात न्यायचंय न्हाऊन.....

मनाच्या धुंदीत
ऋषिकेश नानासाहेब लांडे पवार
बामणी धाराशिव
9657695783

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मैदान

मैदान तुझं मैदान म्हणत म्हणत  सणासुदाला पण  यांनीच घेतलंय रं माझ्या शेताच्या प्रश्नाचं  आजवर तरी कुणाच्या बा ला कळलंय रं सरकार काय करतंय ते ...