मंगळवार, १५ डिसेंबर, २०२०
खरंच करुणा मला लय शीकवून गेला !
पावण्यासारका आला
पाणभरतीच्या भावाला
आयता वाटेकरी जणू पाठवूनच दिला
खरंच करुणा मला लय शीकवून गेला !
बातम्या लिवणारं आन टीवी दावणार जणू
वकिली कराया देवदूतच झाले
८ महिने घरात बसून फकस्त
रामायण ,महाभारत,आन त्या कंगना बयाचे बोलबाले
शेतकऱ्याची आयती भाकर खाऊन त्यासनी साले पण मनुन निघाले
खरंच करुणा मला लय शीकवून गेला !
मधीच गंजाडी कोंतर
वरलाकड फास घेऊन मेलाय म्हणं
त्याच्याच काळजीनं मालकाच येड झालंय मन
दुबार पेरून पण त्या इपितर पावसानं
नीट कुठला खाऊ दिलाय सण ?
कुणीतर दावायचा व्हता पावसातला माझ्या
मायबापाच्या सपनाचा वाहता क्षण
खरंच करुणा मला लय शीकवून गेला !
अजून मदत कराया पाठराखणीची
आला व्हता मन मुखमंतरी
पण ह्या वजाबेरिजि तुन
कुठली मदत उतरलं अंतरी
खरंच करुणा मला लय शीकवून गेला !
गावात,चौकात,येशिवर जरी
लोक जास्त दिसत व्हती
तशीच भाकरीला मवताज झालेली
बिनदिव्याची झोपडी तुमास्नी दिसणारच नव्हती
खरंच करुणा मला लय शीकवून गेला !
आबा बोलला "आमदार लोक आमच्यासाठी
इधिमंडळात भांडत बसत्याती" व्हय
म्या म्हणलो मग
"आम्हांसनी येड्याला काय कळतंय आपल्याला मातर
चुलीपतूरचा आवाज आन उद्याच्या भाकरीचच भय"
खरंच करुणा मला लय शीकवून गेला !
त्यो बच्चन बी नीट व्होउन घरी आलाय म्हण
पर मग ईठुरायच्या दर्शनाला गावागावातून फुकटात लोकांना नेणारा माझा भालके नाना कसा गेला ?
खरंच करुणा मला लय शीकवून गेला !
ऋषिकेश नानासाहेब लांडे पवार
मु पो बामणी ता जि धाराशिव ४१३५०६
टीप - गावठी भाषेत आणि कोणत्याही राजकीय लोकांना संबोधून नाहीय ,कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व
शुक्रवार, १६ ऑक्टोबर, २०२०
माझं मरण दिसत व्हतं
पहिलंच दुबार पेरणी करून कंबरडं मोडलं व्हतं
बोगस ब्याच पैक देऊन अजून हात सुकल नव्हतं
भरीव रानाच्या जीवावर सावकाराच ओझं उपसलं व्हतं
ढीग पाहून जीवाच सोनं झालं व्हतं
माझं तळहातात जपलेल पाडस पण त्या मातीत घामानं वलं झालं व्हतं
अजून पण दम व्हता पण ढीग वाहून जाताना माझं मरण दिसत व्हतं माझं मरण दिसत व्हतं
ऋषिकेश नानासाहेब लांडे पवार
बामणी ता जिल्हा धाराशिव 413506
marathikavitaanicharolya.blogspot.com
सोमवार, १० फेब्रुवारी, २०२०
हिंगणघाट प्रकरण अंकिता ताईची व्यथा
हिंगणघाट प्रकरण अंतिम दिवसाची व्यथा
जमलेल्या जमावाला माझ
इकच विचारनं आहे
वैचारिक महामानवांचा हाच तो
पुरोगामी महाराष्ट्र आहे?
आज माझ्या अंतिम विधीला
का इतका टाहो फोडता ?
भर चौकात मला जाळेपर्यंत
फक्त चित्रफितीच आल्या का काढता
जळून गेलंय शरीर माझं
त्याच दिवशी आता का जाळताय
मुलीने जन्म घेतलाच हा गुन्हा की
फक्त सुतकाचे दिवस पाळताय
स्वतःच्या विद्रुप चेहऱ्याला
पाहण्याची पण इच्छा नव्हती
समाज जागा होणारच नाही
कारण पाश्चात्य संस्कृती भोवती
मी तरी संपले ,बाकीच्या बहिणींनाही
ही वेळ येईल कदाचित
असे अनेक प्रकरण पडलेत कोर्टात
माझी case पण राहील वंचित.......
ऋषिकेश नानासाहेब लांडे पवार बामणी धाराशिव
मैदान
मैदान तुझं मैदान म्हणत म्हणत सणासुदाला पण यांनीच घेतलंय रं माझ्या शेताच्या प्रश्नाचं आजवर तरी कुणाच्या बा ला कळलंय रं सरकार काय करतंय ते ...
-
माणपाणाच्या पलीकडचे स्वावलंबी जग कधी मी पाहिलेच नाही... स्वतःच्या चुकीला थारा देणारे सोडून कधी माघार घेणारे मी पाहिलेच नाही... मान-अपमान...
-
#वाढदिवसाच्या_शिवमय_शिवशुभेच्छा ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ #आपण_शिवनेरीसारखे_यशाचा_उगम_व्हावे, #तोरण्यासारखे_कर्तृत्वाचे_तोरण_बांधावे. #पुरंदरासारख...