रविवार, ३० डिसेंबर, २०१८

माणुसकी हाच धर्म

*आजपासुन काय विसरावे आणि काय जपावं*

2018 किंवा आजपर्यंत झालेल्या आयुष्यात आपण खूप माणसे कमावली ती जपली त्याना कधीच न दुखावता ।त्यांना असेच आपला आयुष्याचा भाग म्हणून चला । कोणी नाराज असेल तर मोठ्या मनाने त्याला मनवा किंवा त्यांची माफी मागा । आपण आयुष्यात येऊन काहीच घेऊन जाणार नाही ,फक्त घेऊन जाणार आहोत ते आपले नाव त्यामुळे नावासाठी आणि माणूस म्हणून जगण्यासाठी ।माणुसकीला कलंक न बनता माणुसकी टिकवण्यासाठी जगा । गरजू व्यक्तीला मदत करा तुमच्या मनाला मिळालेली शांती अनुभवून पहा । आपल्याला नाते जपतानाचा येणारा आनंद हा अनुभवल्यावर आयुष्याची किंमत कळेल । एखादा नाराज असेल तर त्याच्या दुःखाची विचारणा करा त्याच्या दुःखाचा भाग झाल्यावर समोरच्याच्या मनाला आपले ओझे हलके झाल्यासारखे नक्कीच वाटेल । प्रत्येकाने आयुष्यात केलेल्या चूका सुधारण्याची संधी शोधत जगले पाहिजे । पहिले नाते जपणे शिका भले ते रक्ताचे असो वा नसो प्रत्येकाला कधीना कधी एकमेकांना मदत किंवा आधार म्हणून आपल्याकडे पाहावेच लागणार असते। आपण फक्त प्रत्येक येणारा दिवस उत्साहात जगण्याचा प्रयत्न करा । आयुष्याला उमेदीने नाही तर कर्तत्वाने जगा। संस्कृती आणि संस्कार जपणे जमत असेल तर दोन्ही गोष्टी जपा । आपण कोणत्याही क्षेत्रात असाल पण त्या भागाचा एक घटक न बनता केंद्रबिंदू होण्याचा प्रयत्न करा। पण कोणाचे मन न दुखावता हे सगळे झाले तर आपण आयुष्यात आणखीन खूप पुढे जाल ।  संस्कार जपताना आपल्या पालकांचा विचार आणि त्यांची मने नाराज होणार नाहीत असे वागा। आपल्याला आयुष्यात खूप पुढे जायचे आहे, त्यासाठी प्रत्येकाला फक्त 2 शब्द गोड बोला आणि छोटे हास्य चेहऱ्यावर ठेवत चला । हिंदूंचा सण कोणता किंवा कोणाचे काय अश्या जातीवादात जगणे सोडा , सगळे आपले आहेत आणि आपण सगळ्यांसाठी हेच मनात ठेवा कारण कोणीही कधीच छोटा नसतो ,मोठा असणारा कर्तत्वाने असेल पण माणुसकी ही नेमही छोट्या घरातच जन्म घेते । कधीच कोणत्याच गोष्टीचा गर्व नका करू , आपण आयुष्यात फक्त स्वतःला सिद्ध करायला आलोय त्यावरूनच तुमचे कर्तृत्व समजते ।
*Live happy always*
 
Written by ऋषिकेश नानासाहेब लांडे पवार
बामणी धाराशिव

marathikavitaanicharolya.blogspot.com

रविवार, ९ सप्टेंबर, २०१८

लेख on घिसाडी by समाधान शिंदे

घिसाडी

गावातल्या पाटलांच्या वाड्यासमोर फिरस्ती लोकांची पाल उभी राहिली होती.या पालीवरण मटणाचा खमंग वास आख्या चौकात घुमत होता.आम्ही पालीच्या शेजारी उभारलेल्या पोरात सगळ्यात अगोदर नाकापर्यत वास पोहचला तो करकरीत नाकाचा शेंडा लांब असलेल्या सुमित जवळ.थोडया वेळानंतर मी त्या पालीवर गेलो.तेथे माझी भेट झाली, त्या 80 वर्षाच्या रामा चव्हाणशी.मग काय लाकडाच्या बुडावर बसून चालू झाल्या ना गप्पाचा बाजार...
पांढरी शिपट झालेली दाढी,गळ्यात मफलर,धोती,पायात घातलेला जोडा,पिळदार मिश्या खरच रामभाऊ मर्द अस्संल गड्या हुन दिसत हुतं. म्या रामभाऊ ला विचारलं,
कुठून आलात?
आम्ही हूईई धारूर बीड वरण आलोय जी.
कूट निघालात, हे सारं बिऱ्हाड घेऊन.

हे बिऱ्हाड घेऊन निघालो अशिक तुळजापूरला आईच्या दर्शनाला.

मग मात्र माझ्या डोक्यात प्रकाश पडला
अरे बाप!!धो-धो कोसळणाऱ्या पावसात टीचभर पोटासाठी गावागावात जाऊन शेतकऱ्याची काम करून आईच्या दरबारात पोहचणार.
रामभाऊच्या सोबत दोन बैलगाड्या, चार घोड, संसाराला लागणाऱ्या सगळ्या वस्तू,या व्यक्तिरिक्त धंद्यासाठी लागणारा हातोडा,भाता,छनी,ऐरण इ.वस्तू होत्या.
ह्या वस्तूकडे पाहता मी रामभाऊ ला प्रश्न केला की भाऊ मला सांगा,ही ऐरण कधीची हाय?
भाऊ न थोडं स्मितहास्य केलं आणि म्हणाले, बापजाद्या पासन हा धंदा त्यामुळे ती आमच्या पदरात त्यांच्या पासन पडली जी.पुन्हा विचारलं मला सांगा हा हातोडा कधीचा हाय?रामभाऊ न माझ्या कड बघितलं त्यांना वाटलं असलं हे बेन असलं खुळ्यागद प्रश्न का विचारू लागलंय. ह्याला काय काम नाय वाटत.पण पुन्हा एकदा रामभाऊ चे ओठ हलले,त्यांनी सांगितलं असले हातोडे कैक आले नि कैक तुटून गेले याची गणती नाय.या वरण अस समजलं की माणसानं आयुष्यात हातोडा नाही तर ऐरंन बनलं पाहिजे .कारण जे लाखो घाव सोसते म्हणूनच तीच अस्तित्व नष्ट होत नाही.जो माणूस नेहमी हातोडा सारख्या दुसऱ्याच्या आयुष्यावर सारख घाव घालतो.त्याच आतित्व काही कधी ना कधी संपत.म्हणून घाव सोसणारी ऐरंन बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे.एक तासाच्या रामभाऊ सोबत गप्पा मारून आयुष्याच्या तासांच गणितं ह्या रामभाऊ जवळ असणाऱ्या ऐरंन आणि हातोडा ह्या दोघांनी समजविले. पण आमच्या समोर रामभाऊ ची नातवंड फिरत हुती.त्यांना पाहून विचारलं,
ही बच्चे कंपनी जात न्हाई का शाळेत?
जात हुती पण कसय एकाठिकाणी आम्हीच नसल्याने आमवस्यां पौर्णिमेला च शाळेची तोंड बगतीती लेकरं.
जीवनाचा अखेरचा प्रवास रामभाऊ चा चालत असताना ही घिसाडी समाजाची दैना,पोटासाठी चाललेला चारचाकी टांग्या घोड्याचा प्रवासाचा शेवट होऊन,मुलाबाळांच्या हातामधी चार रेघी वही आणि त्यावर लाल पेन कधी फिरणार कुणास ठाऊक.

-समाधान शिंदे

Photo click_sunil kolge

मंगळवार, ३१ जुलै, २०१८

सारथी_पुरस्काराने सन्मानित करण्यात आले #माझे लाडके #मोठे_भाऊ ले मा. #संभाजीराजे_देशमुख  

#सारथी_पुरस्काराने सन्मानित करण्यात आले #माझे लाडके #मोठे_भाऊ ले
मा. #संभाजीराजे_देशमुख                                                                                    
            
           【  परिचय 】
  ◆ संभाजी रा. देशमुख ◆

यांची संक्षिप्त कार्य ओळख ः

       पुणे येथील लोकसत्तामधून 2005पासून त्यांची पत्रकारीतेची सुरुवात झाली. तेथे पाच वर्षे अनेकविध विषयावर लेखन केले. त्यानंतर पुणे सकाळमध्ये गेली दहा वर्षापासून कार्यरत आहेत. पुण्यात असताना जागतिकपातळीवर प्रसिद्ध असलेले वृत्तपत्रांचे रचनाकार (डिझाईऩ) मा. मारिओ गारशिया यांच्यासोबत सकाळमध्ये सुरु केलेल्या प्रकल्पात दीड वर्षे कार्य केले. ते प्रशिक्षण घेऊऩ इतरांनाही प्रशिक्षित करण्याच्या पथकामध्ये त्यांची नियुक्ती होती.

त्याचबरोबर अगदी लहान जागेमध्ये अधिकाधिक माहिती वाचकांना सादर करतना डिझाईचाही विचार अत्यंत महत्वाचा आहे. हा विचार घेऊऩ न्यूज डिझाईऩ आणि स्ट्रॅटेजी या विषय़ावर मोठमोठ्या उद्योगांना परिणामकारक जाहिरातींसाठी मदत करणाऱया एलिफन्ट डिझाईऩ कंपनीसोबत न्यूझीन नावाचा प्रकल्प सकाळमध्ये दोन वर्षे पूर्ण केला. त्याचे संपूर्ण प्रशिक्षण आणि सादरीकरणाच्या पथकातही त्यांचा समावेश होता.

या डिझाईऩचा वापर करून दिलेल्या अनेक बातम्या आजही संदर्भासाठी वापरल्या जातात. त्यामध्ये क्रिमिलिअर विषयावरील उघडा डोळे, वाचा नीट!, आई मला जगायचय!, बापासाठी तीने ओढला साडेदहाटन ऊस  या सारख्या अनेक वृत्तांसह रात्रीचं पुणे हे सदरही पुण्यात खूप गाजलं होतं. तर एका राजकीय पक्षाने सहा वर्षे सजा झालेल्या गुंडाला पक्षात प्रवेश दिला होता. त्याच्या विरोधात पुण्यात तो पक्ष झाला गुंडाची टोळी! या मथळ्याने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याच्या अवघ्या दुसऱयाच दिवशी त्या गुंडाला पक्षाने पत्रकार परिषद घेऊऩ बडतर्फ केल्याचा खुलासा केला होता. तर देवींच्या साडेतीन पीठ असलेल्या मंदिरांमध्ये नारळ फोडणे, आणि दारावर तेल फेकण्याच्या प्रथे विरोधात सतत लेखन केले. त्यानंतर विविध संघटनांनीही आवाज उठविला. त्यामुळे त्या त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱयांनी बंदीचा निर्णय घेतला. आता ही प्रथा संपूर्ण बंद होऊऩ नारळ ओटीत देणे सुरु झाले आहे, हा बदल घडण्यामध्ये अनेकांचे कष्ट होते, त्यात त्यांची पत्रकार म्हणून थोडीशी भूमिका होती.

यानंतर काही कौटुंबिक कारणांमुळे पाच वर्षापूर्वी  त्यांनी लातूर येथील सकाळ कार्यालयात बदली घेतली. त्यालाही गेल्या 1 जुलै 2018 रोजी पाच वर्षे झाली. या काळात अनेक विषयांवर त्यांनी वृत्तलेखन झाले. पाण्याअभावी शस्त्रक्रियाबंदीची बातमी सर्व प्रथम देऊन संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले. याच वृत्तामुळे उच्च न्यायालयाने सुमोटो दाखल करून जिल्हाधिकाऱयांना याबाबत माहिती सादर करण्याचा आदेश दिला होता. सोबत शस्त्रक्रीया सुरुच ठेवण्याचा आदेशही दिला होता. तर माजी मुख्यमंत्री मा. विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर मालमत्तांचे दर कोसळल्याची दिलेली बातमी आजही अनेकांच्या आठवणीत आहे. तर वृत्तलेखनाच्या माध्यमातून राष्ट्रीय कॅडेट कोर (एनसीसी)चे विभागीय कार्यालयासाठी जागा मिळवून देण्यापर्यंत पाठपुरावा केला. त्याचबरोबर पाचवीत शिकणाऱया मुलीला साप चावल्यानंतर शासकीय रुग्णालयात औरंगाबादहून लस तत्काळ  उपलब्ध करून देण्यासाठी अटोकाट प्रयत्न केले. तर आता महिला तंत्रनिकेतन वाचविण्यासाठी अजूनही वृत्तांमधून पाठपुरावा सुरुच आहे.

सकाळ दैनिकाच्या तनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांमध्ये उद्योजकता विकास होण्यासाठी अजूनही प्रयत्नशील आहेत. गेल्या तीन वर्षात तनिष्का व्यासपीठाला ग्रामीण भागातील तीन हजारपेक्षा अधिक महिलांना जोडून घेतले. यात गेल्या एका वर्षात 428 महिलांना घरच्याघरी उद्योग सुरु करण्यासाठी एलईडी माळांच्या निर्मितीचे प्रशिक्षणही दिले.  गुगल कंपनीच्या सहाय्याने  उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातील  ग्रामीण भागातील तब्बल तीस हजार महिलांना दैनंदिन जीवनात इंटरनेटचा वापर कसा करावयाचा, याचे प्रशिक्षण दिले. या प्रकल्पामुळे अनेक महिलांनी युट्यूब हाच गुरु समजून माहिती घेण्यास सुरुवात केली. यातूनच 22 महिलांनी लहान लहान उद्योग सुरु केले आहेत. तर चाळीस महिलांनी आपआपल्या गटाच्या माध्यमातून एलईडी माळा निर्मिती सुरु केली आहे.

शिक्षण ः -  

1)  पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्यूटमधून मास कम्युनिकेशनची पदव्युत्तर पदवी घेतली.

2 - टिळक विद्यापीठात, एम.ए.- (राज्यशास्त्र) एम. ए. (पत्रकारिता)
३. बीएस्सी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, बीए आणि एमए (मराठी ) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक

नाव आणि संपर्क ः

- संभाजी राजाराम देशमुख, मूळ गाव - राजेगाव ता. लोहारा. जि. उस्मानाबाद

- मो. 9011087791

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

गुरुवार, १२ एप्रिल, २०१८

मनाच्या धुंदीत

  ● *मनाच्या धुंदीत* ●
माझ्या खुप दिवसांच्या मेहनतीने, विचारांनी व अनुभवातून लिहिलेल्या *मनाच्या धुंदीत* या काव्य संग्रहाचे प्रकाशन लवकरच लाडके माजी कृषीमंत्री श्री *शरदचंद्रजी पवार साहेब* यांच्या शुभहस्ते होणार आहे.
*काव्य संग्रहाचे विषय* :
माणसातील माणुसकी प्रेम, मोह, परिवार, देशभक्ती, राजकीय हालचाली, भ्रष्टाचार, आजची परिस्थिती,बदलते वारे, माझ्या लाडक्या गावावरील लेख, बालपण,मैत्री इत्यादी.
 _
माझ्या सोबत आपल्या सर्वांचे आशिर्वाद असेच राहो एवढिच इच्छा !!!_
● *विशेष आभार* = *लाडके आदरणीय आजोबा श्री  _अंबादास तात्याबा लांडे  (पवार ),माझे वडील श्री नानासाहेब अंबादास लांडे  (पवार )चेअरमन, विकास सहकारी सोसायटी लिमिटेड बामणी,श्री बालाजी भंडारे  (Range officer,एक्साईज ड्युटी आॅफ महाराष्ट्र ), श्री अरूण पवार* *(संस्थापक अध्यक्ष मराठवाडा जनविकास संघ )* ,  *श्री संभाजी देशमुख* *(उपसंपादक सकाळ पेपर लातुर),श्री अमोल देशमुख  (पर्यटन विकास अधिकारी* *रत्नागिरी ),श्री राहुल देशमुख  (ELEPHANT MATERIAL HANDLING* *EQUIPMENT ),श्री सुनिल बाळासाहेब मुंडे (युवा भक्कम नेतृत्व)*
                              *हनुमान विद्यालय बामणी,तुळजाभवानी सैनिक विद्यालय तुळजापूर, बाबुरावजी घोलप महाविद्यालय सांगवी पुणे  येथील सर्व शिक्षक इतर कर्मचारी. तसेच बामणी येथील सर्व प्रतिष्ठीत व्यक्ती आणि गावकरी मंडळी, शिवछत्रपती मित्रमंडळ बामणी, स्वराज्य प्रतिष्ठान बामणी,शिवबा* *Friends circle सांगवी , विशाल तळेकर, ज्ञानल घुले,निखिल चव्हाण* , *अजिंक्य कांबळे,विशाल मोहिते,राणाकुणाल ठाकुर,प्रतिक निचित,अमोल नावडे, गणेश मारणे,संकेत सोनवणे, महेश गरूड, प्रशांत बनसोडे,शुभम गोळे मित्र परिवार यामध्ये* *उल्लेख करता नाही येणार एवढे मोठी माणसे मला आत्मविश्वास निर्माण करणारी सोबत होती.*

            *आपला विश्वासु*                  

*ऋषिकेश नानासाहेब लांडे पवार बामणी धाराशिव*

गुरुवार, २२ मार्च, २०१८

निखिल दादा चव्हाण निखळ व्यक्तिमत्व

पिंपळे गुरवचे उभरते *दिलखुलास* व्यक्तीमत्व, एक प्रेरणादायी हास्य असणारा चेहरा,नेहमी सामाजिक सलोख्याचे विचार मांडणारे, suzuki access *125* चे मालक, त्याच्याविरुद्ध बोलायची ताकदच होणार नाही असे कर्तृत्व, आपला मनातील विचार directly  मांडुण मोकळे होणारे, कट्टर *मराठमोळ* व्यक्तीमत्व, प्रत्येकाला आपलस करून बोलणारे,चुकणार्याला जागेवरती जाणिव करून देणारे *bindhast*  व्यक्तीमत्व, *जो आपल्यासाठी आला आपण त्याच्यासाठी 1000 वेळा जाणार* , प्रत्येक गोष्ट ही त्यांच्यापासूनच सुरूवात व त्यांच्यापाशी संपणार असे 🚩✌🏻😎 *Royal_कारभार* व्यक्तीमत्व , 🚩 *बजरंग दल* कट्टर समर्थक *मा. पैलवान. निखिल दादा चव्हाण* यांना
आख्खा एक ट्रॅक्टर भरून 🚜, बुलेटला भोंगा लावुन🏍, assces🛵 ची टाकी भरून 🚩🚩 वाढदिवसाच्या हार्दिक  शिवशुभेच्छा !!!!!!
=============================
*ऋषिकेश लांडे मित्र परिवार लांडेवाडी भोसरी*
*प्रतिक निचीत* , *घुले पाटिल* , *AK47* , *विशाल तळेकर* , *राणाकुणाल ठाकुर* ,  *संकेत सोनावणे*
*A S FRIENDS CIRCLE*

रविवार, ११ मार्च, २०१८

स्वच्छता अभियान बामणी

आज बामणी मध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले त्या कार्यक्रमात समाजसेवक पंकज शहाणे यांनी सहपरीवार उपस्थित राहुण योगदान दिले. व सर्व ग्रामस्थांनी पण सहभाग घेऊन अभियान यशस्वी केले त्याबद्दल मि गावकऱ्यांच्या वतीने शहाणे सरांचा मनापासुन ऋणी आहे व प्रत्येक गावात जर अश्या कार्यक्रमाचे आयोजन झाले तर स्वच्छ भारत समृद्ध भारत होण्यास नक्कीच मदत होईल.
    

सोमवार, १९ फेब्रुवारी, २०१८

Raje

*माझ्या राजामुळे आनंद, ऐश्वर्य आणि सौभाग्यासारखे आजही टिकुन आहेत घटक अविभाज्य......*

*१९ फेब्रुवारीला एकदा गौरवशाली महाराष्ट्रात तर येउन तर बघा माझ्या जाणत्या राजाचे गौरवशाली स्वराज्य.....*
🚩🚩🚩 *शुभ रात्री*🚩🚩🚩
*===============================*
- *ऋषिकेश नानासाहेब लांडे पवार बामणी धाराशिव*

रविवार, ४ फेब्रुवारी, २०१८

नवीन आशा व धिक्कार

*संगीताला केवळ स्वरांची साथ असते. ..*
*आपुलकीने जगायला माणुसकी लागते.....*
*दुधामध्ये मिठ टाकुन पहा दुधही नासते.....*
*केवळ संकटाच्याच वेळी आपल्यांची साथ भासते....*
*प्रत्येकाला फक्त आपुलकी आणि प्रेम द्या तुमच्या अंगणात सौभाग्य सदा नांदते.......*

आपले भविष्य पहायला ब्राह्मणच लागतो असं नाही...
आपल्या उज्ज्वल आयुष्यावर  विचार करताना चांगले  कर्म तर करा काही....
मनगटातील ताकद आणि डोक्यातील मेंदु संकटांना देउ शकतो मात...
अरं भिऊन काय बसलाय "मि हे करणारच" म्हणुन नविन जीवनाची पेटवा वात....

*आजकाल आपली आर्थिक परिस्थिती कशी*
*बदलेल तसे वागणुकीत आपण नाचतो....*

*अहो  उपयोग नाही पैशाला किंमत तर*
*यालाच आपण माणसे कसे वाचतो....*

आपण या जीवनाच्या पावसात उभे राहून ओले होतो तर काय उपयोग नाही विनाकारण राहुन भिजत....

आपण खुप नाती जपली असतील पण काय सांगता येत नाही, समोरच्याच्या मनात नेमके असतय काय शिजत......

*बिगर माणुसकीच्या जीवनाच्या भोवऱ्यात अडकलेय सारे जग........*

*प्रत्येकाला आपलेच पडलेय अश्या अविश्वासाने कशी भरल धग.......*

*स्वतःला सिध्द करताना आवाज दाबण्याचा  प्रयत्न केला जातो ....*
*आत्मविश्वासाने जगतोस तर अश्या पोकळ धमक्यांना  का भितो ....*
*स्वतःच्या पायावर उभारून कमाव तुझ नाव....*
*तुझ्या विजयावर शिक्कामोर्तब करायला तु निडर धाव*   
===================================
- ऋषिकेश नानासाहेब लांडे पवार, बामणी धाराशिव
  🚩

शनिवार, ३ फेब्रुवारी, २०१८

आपुलकी व प्रेम

O*एकात्मता आठवते ति एखाद्या*
     *अश्या क्षणी ....*
*तुझ्या ओझरत्या डोळ्यातुन* *अश्रु पुसायलाही*
  *नसतं कुणी ....*
*म्हणुन तर नेहमी आपुलकीचीच* *भावना राहुदे मनी...*

*श्रध्दा ठेवुन नात टिकवता नाही येत*
*त्यासाठी संवादही पुरेसा लागतो ....*

*स्वर्ग पण इथेच आणि नर्क पण इथेच आहे*
*पण विचार करा यासाठी आपण इतरांशी कसे वागतो...*
💐 *
*

कठीण वेळी साथ दिलेल्या माणसाला  चालत नसते कधी विसरून. ....
त्यांच्याही कठीण काळात बसु नका हात पसरून....
 
माणसे ओळखता यायला लागले कि नाती दुरावतात असे वाटते वरून.....
तेव्हा तर कुठे कळते कोणाशिवाय व कोणासोबत चालावे हात धरून.....

एखादा जर प्रगती करत असेल
तर खुप जण असतात करणारे ब्लेम...

पण लक्षात ठेवा जीवनात खुप आनंद आहे
एकदा करून तर बघा माणुसकीवर प्रेम.....

*आयुष्यात असे खुप क्षण येतात*
*जिथे होते इकडे आड आणि इकडे विहिर....*

*कसल्याही मोठ्या संकटांना पेलता*
*येते, फक्त एखादा तरी लागतो प्रेमाने देणारा धीर*

धावपळीच्या या शर्यतीत
अडकून बसलेय जिवन सारे....

आत्मियता संपविणारे या जगात
माणुसकीचे संपलेय वारे......
 
=====================================
- ऋषिकेश नानासाहेब लांडे पवार बामणी धाराशिव

Mine

*स्वतःला सिध्द करताना आवाज दाबण्याचा  प्रयत्न केला जातो ....*
*आत्मविश्वासाने जगतोस तर अश्या पोकळ धमक्यांना  का भितो ....*
*स्वतःच्या पायावर उभारून कमाव तुझ नाव....*
*तुझ्या विजयावर शिक्कामोर्तब करायला तु निडर धाव*   
💐💐 *शुभ सकाळ*💐💐
*- ऋषिकेश नानासाहेब लांडे पवार बामणी धाराशिव*

शुक्रवार, २ फेब्रुवारी, २०१८

मातृ पितृ प्रेम

*तुझ्यावर खुप कामाचा तणाव असेल हे मला आहे मान्य. ...*
*एकदा होऊन तर बग मातृ-पितृत्वाच्या आशिर्वादाने धन्य. ....*
*तुझ्या उज्ज्वल आयुष्यासाठी त्यांनी  किती मारले असेल जिवाला....*
*तुला उपकाराचीच नाही जाणिव तर किंमत नाही तुझ्या नावाला...*
*प्रत्येक गोष्टीत त्यांनी तुझे आयुष्य पाहिले. ...*
*त्यांनी आपले सर्व कर्म तुझवरी वाहिले.....*

- *ऋषिकेश नानासाहेब लांडे पवार, बामणी धाराशिव*

गुरुवार, १ फेब्रुवारी, २०१८

तू करू शकतो

*रंगमंचावर वातावरण तयार होण्यासाठी वाजंत्री वाद्य वाजवितो.*
*माझ्या उज्वलतेसाठी माझा बाप इमानदारीने जगतो मलाही इमानदारी शिकवतो.*
*हे जगसुध्दा अडकलेय लालचेच्या अदभुत जाळ्यात.*
*आता माणुसकीच आणावी लागेल विकत मोळयात.*
*प्रत्येकाला आपल्या मोठेपणावर गर्व आहे अमाप.*
*किती लाभ घेशील रे नुसते सोडुन तोंडातून वाफ....*
💐💐 *शुभ रात्री*💐💐

*कोणाच्या मागे बोलुन जर मनाला शांती वाटत असेल* *तर निश्चिंत बोलावे ....*
*पण आपण एक इमानदार माणुस असल्याचे* *स्वतःच्याच मनाला कसे पटावे.....*
*एखाद्या व्यक्तिमत्त्वावार बोलायला  स्वतःचाही कुवत लागते...*
*त्यासारखे न बनावे परी बोलण्यात शर्मेने तरी घ्यावे* *उरते.....*

स्वतःला सिध्द करताना आवाज दाबण्याचा  प्रयत्न केला जातो ....*
*आत्मविश्वासाने जगतोस तर अश्या पोकळ धमक्यांना  का भितो ....*
*स्वतःच्या पायावर उभारून कमाव तुझ नाव....*
*तुझ्या विजयावर शिक्कामोर्तब करायला तु निडर धाव*   

*आपल्याला पण आयुष्यात तेवढिच मिळते वो जेवढी आपण इतरांना देतो इज्जत.....*

*आपल्याही मनात श्रद्धा व नम्रता असेल तर दिव्यासारखा संयम ठेवावा विझत.....*

तुला जे काही ज्ञान आहे ते सगळ्यांना वाटुन टाक निडर....

ज्ञानवाटपाच्या या दुनियेत जयघोषात निर्विघ्नपणे होऊन जाशील लिडर....
================================
🚩🚩
- *ऋषिकेश नानासाहेब लांडे पवार बामणी धाराशिव*

बुधवार, ३१ जानेवारी, २०१८

राजकारणी नशा

मनावर दगड ठेवुन लढणारा  लढवय्या आहे माझा अनुभव
माझ्यासारख्या युवा पिढीला राजकारणीच का लागते चव
आजकालची युवाशक्ती अडकलीय सोशल मिडिया च्या जाळ्यात
त्याना माहीतही  नसते  काय काय पिकते आपल्या बापाच्या मळ्यात
*Just सुचले*
*ऋषिकेश नानासाहेब लांडे  पवार बामणी धाराशिव*

मैदान

मैदान तुझं मैदान म्हणत म्हणत  सणासुदाला पण  यांनीच घेतलंय रं माझ्या शेताच्या प्रश्नाचं  आजवर तरी कुणाच्या बा ला कळलंय रं सरकार काय करतंय ते ...