O*एकात्मता आठवते ति एखाद्या*
*अश्या क्षणी ....*
*तुझ्या ओझरत्या डोळ्यातुन* *अश्रु पुसायलाही*
*नसतं कुणी ....*
*म्हणुन तर नेहमी आपुलकीचीच* *भावना राहुदे मनी...*
*श्रध्दा ठेवुन नात टिकवता नाही येत*
*त्यासाठी संवादही पुरेसा लागतो ....*
*स्वर्ग पण इथेच आणि नर्क पण इथेच आहे*
*पण विचार करा यासाठी आपण इतरांशी कसे वागतो...*
💐 *
*
कठीण वेळी साथ दिलेल्या माणसाला चालत नसते कधी विसरून. ....
त्यांच्याही कठीण काळात बसु नका हात पसरून....
माणसे ओळखता यायला लागले कि नाती दुरावतात असे वाटते वरून.....
तेव्हा तर कुठे कळते कोणाशिवाय व कोणासोबत चालावे हात धरून.....
एखादा जर प्रगती करत असेल
तर खुप जण असतात करणारे ब्लेम...
पण लक्षात ठेवा जीवनात खुप आनंद आहे
एकदा करून तर बघा माणुसकीवर प्रेम.....
*आयुष्यात असे खुप क्षण येतात*
*जिथे होते इकडे आड आणि इकडे विहिर....*
*कसल्याही मोठ्या संकटांना पेलता*
*येते, फक्त एखादा तरी लागतो प्रेमाने देणारा धीर*
धावपळीच्या या शर्यतीत
अडकून बसलेय जिवन सारे....
आत्मियता संपविणारे या जगात
माणुसकीचे संपलेय वारे......
=====================================
- ऋषिकेश नानासाहेब लांडे पवार बामणी धाराशिव
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा