*आजपासुन काय विसरावे आणि काय जपावं*
2018 किंवा आजपर्यंत झालेल्या आयुष्यात आपण खूप माणसे कमावली ती जपली त्याना कधीच न दुखावता ।त्यांना असेच आपला आयुष्याचा भाग म्हणून चला । कोणी नाराज असेल तर मोठ्या मनाने त्याला मनवा किंवा त्यांची माफी मागा । आपण आयुष्यात येऊन काहीच घेऊन जाणार नाही ,फक्त घेऊन जाणार आहोत ते आपले नाव त्यामुळे नावासाठी आणि माणूस म्हणून जगण्यासाठी ।माणुसकीला कलंक न बनता माणुसकी टिकवण्यासाठी जगा । गरजू व्यक्तीला मदत करा तुमच्या मनाला मिळालेली शांती अनुभवून पहा । आपल्याला नाते जपतानाचा येणारा आनंद हा अनुभवल्यावर आयुष्याची किंमत कळेल । एखादा नाराज असेल तर त्याच्या दुःखाची विचारणा करा त्याच्या दुःखाचा भाग झाल्यावर समोरच्याच्या मनाला आपले ओझे हलके झाल्यासारखे नक्कीच वाटेल । प्रत्येकाने आयुष्यात केलेल्या चूका सुधारण्याची संधी शोधत जगले पाहिजे । पहिले नाते जपणे शिका भले ते रक्ताचे असो वा नसो प्रत्येकाला कधीना कधी एकमेकांना मदत किंवा आधार म्हणून आपल्याकडे पाहावेच लागणार असते। आपण फक्त प्रत्येक येणारा दिवस उत्साहात जगण्याचा प्रयत्न करा । आयुष्याला उमेदीने नाही तर कर्तत्वाने जगा। संस्कृती आणि संस्कार जपणे जमत असेल तर दोन्ही गोष्टी जपा । आपण कोणत्याही क्षेत्रात असाल पण त्या भागाचा एक घटक न बनता केंद्रबिंदू होण्याचा प्रयत्न करा। पण कोणाचे मन न दुखावता हे सगळे झाले तर आपण आयुष्यात आणखीन खूप पुढे जाल । संस्कार जपताना आपल्या पालकांचा विचार आणि त्यांची मने नाराज होणार नाहीत असे वागा। आपल्याला आयुष्यात खूप पुढे जायचे आहे, त्यासाठी प्रत्येकाला फक्त 2 शब्द गोड बोला आणि छोटे हास्य चेहऱ्यावर ठेवत चला । हिंदूंचा सण कोणता किंवा कोणाचे काय अश्या जातीवादात जगणे सोडा , सगळे आपले आहेत आणि आपण सगळ्यांसाठी हेच मनात ठेवा कारण कोणीही कधीच छोटा नसतो ,मोठा असणारा कर्तत्वाने असेल पण माणुसकी ही नेमही छोट्या घरातच जन्म घेते । कधीच कोणत्याच गोष्टीचा गर्व नका करू , आपण आयुष्यात फक्त स्वतःला सिद्ध करायला आलोय त्यावरूनच तुमचे कर्तृत्व समजते ।
*Live happy always*
Written by ऋषिकेश नानासाहेब लांडे पवार
बामणी धाराशिव
marathikavitaanicharolya.blogspot.com