रविवार, ९ सप्टेंबर, २०१८

लेख on घिसाडी by समाधान शिंदे

घिसाडी

गावातल्या पाटलांच्या वाड्यासमोर फिरस्ती लोकांची पाल उभी राहिली होती.या पालीवरण मटणाचा खमंग वास आख्या चौकात घुमत होता.आम्ही पालीच्या शेजारी उभारलेल्या पोरात सगळ्यात अगोदर नाकापर्यत वास पोहचला तो करकरीत नाकाचा शेंडा लांब असलेल्या सुमित जवळ.थोडया वेळानंतर मी त्या पालीवर गेलो.तेथे माझी भेट झाली, त्या 80 वर्षाच्या रामा चव्हाणशी.मग काय लाकडाच्या बुडावर बसून चालू झाल्या ना गप्पाचा बाजार...
पांढरी शिपट झालेली दाढी,गळ्यात मफलर,धोती,पायात घातलेला जोडा,पिळदार मिश्या खरच रामभाऊ मर्द अस्संल गड्या हुन दिसत हुतं. म्या रामभाऊ ला विचारलं,
कुठून आलात?
आम्ही हूईई धारूर बीड वरण आलोय जी.
कूट निघालात, हे सारं बिऱ्हाड घेऊन.

हे बिऱ्हाड घेऊन निघालो अशिक तुळजापूरला आईच्या दर्शनाला.

मग मात्र माझ्या डोक्यात प्रकाश पडला
अरे बाप!!धो-धो कोसळणाऱ्या पावसात टीचभर पोटासाठी गावागावात जाऊन शेतकऱ्याची काम करून आईच्या दरबारात पोहचणार.
रामभाऊच्या सोबत दोन बैलगाड्या, चार घोड, संसाराला लागणाऱ्या सगळ्या वस्तू,या व्यक्तिरिक्त धंद्यासाठी लागणारा हातोडा,भाता,छनी,ऐरण इ.वस्तू होत्या.
ह्या वस्तूकडे पाहता मी रामभाऊ ला प्रश्न केला की भाऊ मला सांगा,ही ऐरण कधीची हाय?
भाऊ न थोडं स्मितहास्य केलं आणि म्हणाले, बापजाद्या पासन हा धंदा त्यामुळे ती आमच्या पदरात त्यांच्या पासन पडली जी.पुन्हा विचारलं मला सांगा हा हातोडा कधीचा हाय?रामभाऊ न माझ्या कड बघितलं त्यांना वाटलं असलं हे बेन असलं खुळ्यागद प्रश्न का विचारू लागलंय. ह्याला काय काम नाय वाटत.पण पुन्हा एकदा रामभाऊ चे ओठ हलले,त्यांनी सांगितलं असले हातोडे कैक आले नि कैक तुटून गेले याची गणती नाय.या वरण अस समजलं की माणसानं आयुष्यात हातोडा नाही तर ऐरंन बनलं पाहिजे .कारण जे लाखो घाव सोसते म्हणूनच तीच अस्तित्व नष्ट होत नाही.जो माणूस नेहमी हातोडा सारख्या दुसऱ्याच्या आयुष्यावर सारख घाव घालतो.त्याच आतित्व काही कधी ना कधी संपत.म्हणून घाव सोसणारी ऐरंन बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे.एक तासाच्या रामभाऊ सोबत गप्पा मारून आयुष्याच्या तासांच गणितं ह्या रामभाऊ जवळ असणाऱ्या ऐरंन आणि हातोडा ह्या दोघांनी समजविले. पण आमच्या समोर रामभाऊ ची नातवंड फिरत हुती.त्यांना पाहून विचारलं,
ही बच्चे कंपनी जात न्हाई का शाळेत?
जात हुती पण कसय एकाठिकाणी आम्हीच नसल्याने आमवस्यां पौर्णिमेला च शाळेची तोंड बगतीती लेकरं.
जीवनाचा अखेरचा प्रवास रामभाऊ चा चालत असताना ही घिसाडी समाजाची दैना,पोटासाठी चाललेला चारचाकी टांग्या घोड्याचा प्रवासाचा शेवट होऊन,मुलाबाळांच्या हातामधी चार रेघी वही आणि त्यावर लाल पेन कधी फिरणार कुणास ठाऊक.

-समाधान शिंदे

Photo click_sunil kolge

मैदान

मैदान तुझं मैदान म्हणत म्हणत  सणासुदाला पण  यांनीच घेतलंय रं माझ्या शेताच्या प्रश्नाचं  आजवर तरी कुणाच्या बा ला कळलंय रं सरकार काय करतंय ते ...