#सारथी_पुरस्काराने सन्मानित करण्यात आले #माझे लाडके #मोठे_भाऊ ले
मा. #संभाजीराजे_देशमुख
【 परिचय 】
◆ संभाजी रा. देशमुख ◆
यांची संक्षिप्त कार्य ओळख ः
पुणे येथील लोकसत्तामधून 2005पासून त्यांची पत्रकारीतेची सुरुवात झाली. तेथे पाच वर्षे अनेकविध विषयावर लेखन केले. त्यानंतर पुणे सकाळमध्ये गेली दहा वर्षापासून कार्यरत आहेत. पुण्यात असताना जागतिकपातळीवर प्रसिद्ध असलेले वृत्तपत्रांचे रचनाकार (डिझाईऩ) मा. मारिओ गारशिया यांच्यासोबत सकाळमध्ये सुरु केलेल्या प्रकल्पात दीड वर्षे कार्य केले. ते प्रशिक्षण घेऊऩ इतरांनाही प्रशिक्षित करण्याच्या पथकामध्ये त्यांची नियुक्ती होती.
त्याचबरोबर अगदी लहान जागेमध्ये अधिकाधिक माहिती वाचकांना सादर करतना डिझाईचाही विचार अत्यंत महत्वाचा आहे. हा विचार घेऊऩ न्यूज डिझाईऩ आणि स्ट्रॅटेजी या विषय़ावर मोठमोठ्या उद्योगांना परिणामकारक जाहिरातींसाठी मदत करणाऱया एलिफन्ट डिझाईऩ कंपनीसोबत न्यूझीन नावाचा प्रकल्प सकाळमध्ये दोन वर्षे पूर्ण केला. त्याचे संपूर्ण प्रशिक्षण आणि सादरीकरणाच्या पथकातही त्यांचा समावेश होता.
या डिझाईऩचा वापर करून दिलेल्या अनेक बातम्या आजही संदर्भासाठी वापरल्या जातात. त्यामध्ये क्रिमिलिअर विषयावरील उघडा डोळे, वाचा नीट!, आई मला जगायचय!, बापासाठी तीने ओढला साडेदहाटन ऊस या सारख्या अनेक वृत्तांसह रात्रीचं पुणे हे सदरही पुण्यात खूप गाजलं होतं. तर एका राजकीय पक्षाने सहा वर्षे सजा झालेल्या गुंडाला पक्षात प्रवेश दिला होता. त्याच्या विरोधात पुण्यात तो पक्ष झाला गुंडाची टोळी! या मथळ्याने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याच्या अवघ्या दुसऱयाच दिवशी त्या गुंडाला पक्षाने पत्रकार परिषद घेऊऩ बडतर्फ केल्याचा खुलासा केला होता. तर देवींच्या साडेतीन पीठ असलेल्या मंदिरांमध्ये नारळ फोडणे, आणि दारावर तेल फेकण्याच्या प्रथे विरोधात सतत लेखन केले. त्यानंतर विविध संघटनांनीही आवाज उठविला. त्यामुळे त्या त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱयांनी बंदीचा निर्णय घेतला. आता ही प्रथा संपूर्ण बंद होऊऩ नारळ ओटीत देणे सुरु झाले आहे, हा बदल घडण्यामध्ये अनेकांचे कष्ट होते, त्यात त्यांची पत्रकार म्हणून थोडीशी भूमिका होती.
यानंतर काही कौटुंबिक कारणांमुळे पाच वर्षापूर्वी त्यांनी लातूर येथील सकाळ कार्यालयात बदली घेतली. त्यालाही गेल्या 1 जुलै 2018 रोजी पाच वर्षे झाली. या काळात अनेक विषयांवर त्यांनी वृत्तलेखन झाले. पाण्याअभावी शस्त्रक्रियाबंदीची बातमी सर्व प्रथम देऊन संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले. याच वृत्तामुळे उच्च न्यायालयाने सुमोटो दाखल करून जिल्हाधिकाऱयांना याबाबत माहिती सादर करण्याचा आदेश दिला होता. सोबत शस्त्रक्रीया सुरुच ठेवण्याचा आदेशही दिला होता. तर माजी मुख्यमंत्री मा. विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर मालमत्तांचे दर कोसळल्याची दिलेली बातमी आजही अनेकांच्या आठवणीत आहे. तर वृत्तलेखनाच्या माध्यमातून राष्ट्रीय कॅडेट कोर (एनसीसी)चे विभागीय कार्यालयासाठी जागा मिळवून देण्यापर्यंत पाठपुरावा केला. त्याचबरोबर पाचवीत शिकणाऱया मुलीला साप चावल्यानंतर शासकीय रुग्णालयात औरंगाबादहून लस तत्काळ उपलब्ध करून देण्यासाठी अटोकाट प्रयत्न केले. तर आता महिला तंत्रनिकेतन वाचविण्यासाठी अजूनही वृत्तांमधून पाठपुरावा सुरुच आहे.
सकाळ दैनिकाच्या तनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांमध्ये उद्योजकता विकास होण्यासाठी अजूनही प्रयत्नशील आहेत. गेल्या तीन वर्षात तनिष्का व्यासपीठाला ग्रामीण भागातील तीन हजारपेक्षा अधिक महिलांना जोडून घेतले. यात गेल्या एका वर्षात 428 महिलांना घरच्याघरी उद्योग सुरु करण्यासाठी एलईडी माळांच्या निर्मितीचे प्रशिक्षणही दिले. गुगल कंपनीच्या सहाय्याने उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तब्बल तीस हजार महिलांना दैनंदिन जीवनात इंटरनेटचा वापर कसा करावयाचा, याचे प्रशिक्षण दिले. या प्रकल्पामुळे अनेक महिलांनी युट्यूब हाच गुरु समजून माहिती घेण्यास सुरुवात केली. यातूनच 22 महिलांनी लहान लहान उद्योग सुरु केले आहेत. तर चाळीस महिलांनी आपआपल्या गटाच्या माध्यमातून एलईडी माळा निर्मिती सुरु केली आहे.
शिक्षण ः -
1) पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्यूटमधून मास कम्युनिकेशनची पदव्युत्तर पदवी घेतली.
2 - टिळक विद्यापीठात, एम.ए.- (राज्यशास्त्र) एम. ए. (पत्रकारिता)
३. बीएस्सी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, बीए आणि एमए (मराठी ) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक
नाव आणि संपर्क ः
- संभाजी राजाराम देशमुख, मूळ गाव - राजेगाव ता. लोहारा. जि. उस्मानाबाद
- मो. 9011087791
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा