शेतकरी
काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल पण
झाले असेल सगळ्यांचे पाहुनी
सनसामान्यांच्या जिवनातले दररोजचे अडथळे कधी जातील वाहुनी.
तुमच्या-आमच्या जनसामान्यांच्या
प्रश्नांचं कोणाला पडलयं खरं
एका नेत्याच्या पोराचं
आणि गलिच्छ राजकारणाच्या ढोराचं
आपल्यासनी मनापासून कौतुक हाय बरं..
गोगलगाय पण येचुन झाली सोयाबीन माझी नासुन गेली. मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाची बातमी लाचारांनी अजून पण बंद नाय केली......
तुझ्या गेलसालच्या पिकाचा हमीभाव सरकारचा घोळ मिटुस्तवर येत नाय वरं
मग लाखाचं बी बियाणं मातीत इस्कटायला तुझचं धाडीस कस काय झाल रं..
तु सावकाराच्या नजरेला नजर मिळवुनी
नडलास काय नि मेलास काय
एका रातीत मालक बदलनारी माणसं आपल्यासाठी झगडतील असा माझा बि भरम हाय..
जग थांबल, सरकार बदलल
पण ह्यो शेतकरी नावाचा माथ्याला लावलेला टिळा
तुलाच मिरवाचाय
तुलाच मिरवाचाय
त्यामुळ माझी माय
येतील आपल बी सोन्याचं दिस बगायं
तु फकस्त धीरानं रहायं
तु फकस्त धीरानं रहायं
ऋषिकेश नानानासाहेब पवार
मु पो बामणी
ता. जि. धाराशिव 9657695783
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा