शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०२१

बाप कधी समजलाच नाही ...

कधी मोठ्या आवाजात ओरडून ,
कधी अबोला धरताना पाहिला बापाला
पण त्यामागची काळजी करणारा
बाप कधी समजलाच नाही...

कधी खळखळ ओसंडून वाहणारा धबधबा तर कधी डोक्यावरून फिरवलेला सुरकूतलेला हात साधा
पण आईच्या प्रेमापुढं
बाप कधी समजलाच नाही...

आईच लाडात खाऊ घातलेलं ताट मनात
घर करून बसतंय खरं
पण लेकासाठी नोटला नोट जोडून कपाटाची चावी
जपणारा बाप कधी समजलाच नाही...

कधी एखादा फटका मारला बी असलं रागात
आईन आपल्याला हळूच पदराखाली घेऊन पांघरून बी असलं घातलं
पण त्या चुकीतून ल्योक सुधारेल ह्या आशेत जगणारा बाप कधी समजलाच नाही...

त्याच्या अपेक्षा लय बारीक अस्त्यात परी लेकीवर जास्त जीव लागत बी असलं त्याचा
पण एखादं चांगलं काम केलं की
"माझ्या वाघानं करून दावल " म्हणणारा
बाप कधी समजलाच नाही...

बोलता नसलं येत त्येला आपल्या
नवीन दुनियेतील भाषा
पण चांगल्या संस्कारसाठी आणि त्याच्या नावलौकीकासाठी दिनरात राबणारा
बाप कधी समजलाच नाही...

गळ्यात लेकाच्या पडून कधी
घेतला नसेल श्वास त्यानं पण हक्कानं पाठीवर थाप देऊन
'ऊठ ये माकडा ' म्हणणारा
बाप कधी समजलाच नाही....

मनाच्या धुंदीत
ऋषिकेश नानासाहेब पवार (लांडे)
बामणी धाराशिव 413506
मो 9657695783



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मैदान

मैदान तुझं मैदान म्हणत म्हणत  सणासुदाला पण  यांनीच घेतलंय रं माझ्या शेताच्या प्रश्नाचं  आजवर तरी कुणाच्या बा ला कळलंय रं सरकार काय करतंय ते ...