माझ्या बोलण्याला समजून घेणारं कुणी
असलं कारं तिकडं
म्या कमवाया आलो होतो पैका पण
त्याच्या बोलण्याच समजतील का मला आकडं...
आपल्या राजानं आपल्याला
हीच नव्ह संस्कृती दिली
मग आपल्या लोकासनी सोप्या भाषेतील
समजत का नाय दाटणारी सावली...
मला शाळा शिकूस्तर माझी भाषा
लय ग्वाड हाय वाटाचं
मग ह्या कंपनी तल्या साहेबासणी
पाणीच लागतंय फिल्टरच ना की माठाचं..
माझ्या बानं त्याची ऐपत नसताना
तालुक्यावर नेऊन शाळा शिकविला
मग माझ्या भाषेला कोण समजून घेत नाय
त्याला का सविंधानात कलम नाय बनविला?...
माझ्यासारख्या बऱ्याच शिकाऊ पोरासनी
बोलण्यासाठी जीभ रेटत नाय हैंची
का तर आमच्यासंग बोलायला लाज वाटती
ह्यांना कवा मातृभाषा अवगत व्हाची...
मी गबाळ गुंडाळून गावाकडं
जायच्या तयारीत पण व्हतो
पण माझ्या राज्यानं उभारलेले स्वराज्य
अस दुसऱ्या भाषेत आंधळं झालेलं बगून भितो.....
मनाच्या धुंदीत
ऋषिकेश नानासाहेब पवार लांडे
9657695783
बामणी धाराशिव
413506
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा