रविवार, ७ नोव्हेंबर, २०२१

माणुसकीचे भान 🤐📝

असह्य वेदना,जबाबदारी याच ओझं कोणाला नसते
सोपं असत फक्त अलगद कारण सांगून बाजूला होणं

मी ही सोसलय सगळं अनुभव घेऊन जग पाहतो
हिंदुसलेला राग नसे मनी , कसंबसं तरी साधं जीणं

प्रेम ,जग ,अनुभव यावर बोलून वेगळे काय सांगू
आपुसक गळून पडलेलं पान तेच माझं आसमंताच ओसाड रान

जग हे असेच आहे आणि असच राहील काही गोष्टी सोडता सुटत नाहीत म्हणून मुकाट्याने सोसत चला अपमान

बदला घेणं किंवा प्रत्युत्तर देणं असा सांगाडा जोडून मी कसा बाजूला होईल
खुप जग पाहिलंय म्हणून टिकवून आहे
सहनशीलतेत अजूनही माणुसकीच भान
Rushi...🖋️

1 टिप्पणी:

  1. माणुसकी हिच आपल्यातील चांगुलपणाचा भाव असतो आणि तोच आपल्या सुखी जीवनाचा आधार बनतो .👍

    उत्तर द्याहटवा

मैदान

मैदान तुझं मैदान म्हणत म्हणत  सणासुदाला पण  यांनीच घेतलंय रं माझ्या शेताच्या प्रश्नाचं  आजवर तरी कुणाच्या बा ला कळलंय रं सरकार काय करतंय ते ...