शनिवार, ६ फेब्रुवारी, २०२१

जरा जपून..😊👍

माणपाणाच्या पलीकडचे स्वावलंबी जग कधी
मी पाहिलेच नाही...
स्वतःच्या चुकीला थारा देणारे सोडून
कधी माघार घेणारे मी पाहिलेच नाही...
मान-अपमान याचा विचार कधी नाते तोडतो पण
तुटलेली मनं जोडणारा कधी पाहिलाच नाही...
जीवाला जीव देणारा आपली सहनशक्ती जपतो खरा पण
त्याच्या ह्रदयात दाटलेल्या वेदना कधी समजल्याच नाही...
मनस्वी विचारांचा पडदा,सोबत स्वकर्तुत्वाचा झेंडा फडकवला असेलही तुम्ही पण
त्यामागे जाणारी आपली हक्काची माणसे तुम्हाला दिसणारच नाही.....
त्यामुळं जरा जपून.....

मनाच्या धुंदीत
ऋषिकेश नानासाहेब पवार (लांडे)
बामणी ता जि धाराशिव 413506

1 टिप्पणी:

मैदान

मैदान तुझं मैदान म्हणत म्हणत  सणासुदाला पण  यांनीच घेतलंय रं माझ्या शेताच्या प्रश्नाचं  आजवर तरी कुणाच्या बा ला कळलंय रं सरकार काय करतंय ते ...